शिवसेना उबाठा पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला अमर कांबळे यांच्या प्रचारार्थ
संपूर्ण मोहोळ शहरात संपर्क अभियान
मशाल चिन्हाच्या माध्यमातून शिवसेनेने प्रचाराच्या माध्यमातून व्यापले संपूर्ण शहर
ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह युवा शिवसैनिकांचा मोठा सहभाग
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवार उज्वला अमर कांबळे यांनी मशाल चिन्हाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात डोअर टू डोअर प्रचाराला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक आठ मधून दिमाखात प्रचाराला सुरुवात केली असून शेकडो शिवसैनिकांसमवेत त्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याच्या संपर्कात जाऊन शिवसेनेची विचारधारा आणि मशालीची विकासधारा अत्यंत प्रभावी माध्यमातून पटवून देत आहेत.
शिवसेनेचे निष्ठावंत नेते अमरअण्णा कांबळे, महेशभाईजी देशमुख, प्रभाग आठ मधील उमेदवार नागेश थिटे, जिब्राईल शेख,धनंजय बनसोडे,निसार शेख,महादेव इंगळे, डॉ.संग्राम गायकवाड, एडव्होकेट हर्षल (एच.डी. ) देशमुख,अहमद शेख वाजीद मिर्जा,सूरज थिटे,अशोक गायकवाड, बाबा वाघे, अनिल काटे, प्रदीप मगर,राजश्री इंगळे, साधना माने, कांचन गायकवाड, अमृता जगताप, जयश्री काळे, अंजली चव्हाण, वंदना इंगळे, पुष्पा कोळी यांच्यासह आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत प्रभागातील सर्व लहान मोठ्या शिवसैनिकांशी उत्तम समन्वय ठेवत एकदिलाने प्रचारला सुरुवात केली आहे.
चौकट
प्रभाग क्रमांक आठच्या आजुबाजूचा असलेला प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक सात यामध्ये देखील उज्वला कांबळे यांच्या प्रचाराला चांगलीच गती आली आहे. त्यामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला भगिनी समवेत उज्वला कांबळे यांच्या प्रचारासाठी चांगलीच आघाडी घेतली आहे.
चौकट
ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहरातील शिवसेनेच्या मशाल चिन्हाच्या प्रचाराची धुरा अत्यंत प्रभावीपणे हाताळली असून त्यामध्ये त्यांना मोठे यश मिळताना दिसत आहे. त्यामध्ये शिवसेना पदाधिकारी त्याचबरोबर शिवसेनेच्या लढवय्या धोरणाच्या शिवसैनिकांचा मोठा वाटा असून शिवसेनेने मोहोळ शहरातील वातावरण चांगले तापवायला सुरुवात केल्यामुळे शहरातील वातावरण हळूहळू मशालीच्या दिशेने अग्रेसिव्ह होताना दिसत आहे.
.jpg)
0 Comments