पंढरपूर नगरपरिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रूपाली चाकणकर यांची पदयात्रा
पदयात्रेस मिळाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-
पंढरपूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविले असून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक १ ब मधून मंदा शिवाजी धोत्रे, प्रभाग क्र. ३ ब मधून संजय आत्माराम ननवरे व प्रभाग क्र. १७ ब मधून प्रभावती दिगंबर सुडके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.
या पदयात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके, शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, महिला शहराध्यक्षा कांचन जाधव, सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक सुनिल पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव, सारंग महामुनी, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष योगेश जाधव, प्रदिप तांडेल, जिल्हा उपाध्यक्ष सिमा बागल, तालुकाध्यक्षा राणी सुतार, शहर कार्याध्यक्ष प्रियांका सोळंकी, तालुका उपाध्यक्ष वसीम पठाण सतीश नागणे, सचिन पवार, अमोल पवार आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूकीस उभे असणाऱ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. त्यास नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक येत असतील तर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हत्तीच बळ येते अन् ही तिन्ही उमेदवार नक्कीच विजयी होतील एन जनतेने दिलेल्या संधीचे सोने आम्ही नक्कीच करून दाखवू असा विश्वास प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

0 Comments