Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र थेऊर येथील, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

 श्रीक्षेत्र थेऊर येथील, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.




थेऊर ( प्रविण शेंडगे ) :(कटूसत्य वृत्त):-
श्रीक्षेत्र थेऊर येथे आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवीताई काकडे यांच्या वतीने, थेऊर पेशवेवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये तब्बल 1770 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून, समाजाच्या आरोग्याबाबतची जागरूकता अधोरेखित केली.

शिबिरादरम्यान 1260 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 820 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 38 रुग्णांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता निदान झाली असून या सर्वांवर पुढील काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 3 नागरिकांना कृत्रिम हात व पाय मोफत देण्याची नोंदणी करण्यात आली.

या महाआरोग्य शिबिरात हृदयविकार तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच हात-पायांच्या कृत्रिम अवयवांसाठी नोंदणीची सुविधाही उपलब्ध होती.

या उपक्रमामुळे थेऊर परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या असून, शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आरोग्यदूत युवराज काकडे व पल्लवीताई युवराज काकडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments