अभिनेते आनंदकुमार सरवदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
अंकोली(कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील मौजे नजीकपिंपरी येथील सुपुत्र सुप्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक, तथा अभिनेते आनंदकुमार सरवदे यांना "प्रबुध्द दिग्दर्शक" हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
येत्या २८ नोहेम्बर ला सोलापूर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यशोधक महात्मा फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले असून या कार्यक्रमात आनंदकुमार सरवदे यांचा सन्मान केला जाणार आहे.
आनंदकुमार सरवदे हे मूळचे नजिकपिंपरी गावचे रहिवासी असून गेली पंचवीस वर्षे ते सिनेमा क्षेत्रात काम कार्यरत आहेत. तालुक्यातील अनेक कलाकारांना त्यांनी चित्रपटात काम करण्याची संधी दिलेली आहे.चित्रपट तर सगळेच करतात, परंतु आनंदकुमार यांच्या प्रत्येक चित्रपट लेखणात बुद्ध, फुले, शिव, शाहू हि विचारधारा कायम असते.त्याचे लघुपट कायम अंधश्रद्दा निर्मुलनाचे सामजिक काम करत आले आहेत.त्यांच्या "राम अकबर कांबळे "चित्रपटाला नुकताच गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोकृष्ट पुरस्कार दिला गेला आहे.यापूर्वी त्यांचे तुरूंग देस(मराठी), पैगाम (हिन्दी) या चित्रपटामध्ये ते प्रमुख भूमिकेत दिसले होते.आगामी बांझ या हिंदी सीनेमात मुख्य खलनायकाच्या रूपात ते दिसणार आहेत.
ग्रामीण भागातून जाऊन ,आपल्या कष्टाने सिनेक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी कलावंताचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने, सन्मान करताना सर्वांना आनंद होत आहे असे,अखिल भारतीय प्रबुध्द नाट्य परिषेदेचे अध्यक्ष डाॅ,किर्तिपालजी गायकवाड यांनी सांगितले. या कार्यक्रमासाटी भारतीय प्रबुध्द चित्रपट चळवळी चे जनक चित्रपट निर्माते अभिनेते भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड हे उपस्थितीत राहणार आहेत. तरी आपण बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे प्रबुध्द रंगभूमीच्या सोलापूर शाखेने कळविले आहे.

0 Comments