सहकार महर्षी’ साखर कारखान्याच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून सुरक्षा बळकट; वाहतूक चालकांना पोलिसांकडून मार्गदर्शन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी कारखान्याच्या सर्व वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरज उबाळे आणि मोटार वाहन निरीक्षक शीतल शिंदे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
यावेळी पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी वाहनचालकांना वाहतूक करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
त्यात अपघात टाळण्यासाठी सुरक्षित वेग, रिफ्लेक्टरचा योग्य व सातत्यपूर्ण वापर, वाहनाच्या टेपरेकॉर्डरचा अनावश्यक आवाज टाळणे, वाहन चालविताना मद्यपान न करणे, मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळणे. रात्रीच्या वेळी प्रकाशमान चिन्हांचा वापर. यांसह अनेक सुरक्षा उपायांची माहिती देण्यात आली.
मोटार वाहन निरीक्षक शीतल शिंदे यांनी हंगामात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना दिली.
कारखान्याचे कार्यसंचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले की, “राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी साखर कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
गळीतीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था व सुरक्षा उपायांवर कारखाना विशेष भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रिफ्लेक्टर बसविण्याच्या कार्यक्रमाला ऊस तोडणी–वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम, वाहन चालक–मालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाधान चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सहकार महर्षी साखर कारखान्याचा वाहतूक सुरक्षा उपक्रम हा गळीत हंगामातील अपघात रोखण्यासाठी आणि चालकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
0 Comments