Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक समिती जाहीर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक समिती जाहीर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार तयारी केली जात असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच पक्षाकडून जिल्हा निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींचा या निवड समितीत समावेश असून या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख व कार्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरचिटणीस रवींद्र पवार यांनी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांना नुकतेच या जिल्हा निवडणूक समितीचे पत्र पाठवले असून यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, आ.अभिजीत पाटील, आ.उत्तमराव जानकर, आ. राजू खरे, आ.नारायण आबा पाटील,माजी आ. लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार रमेश कदम, शेखर माने,अनिल सावंत, विश्वासराव बारबोले, बाबुराव गायकवाड,सूरज देशमुख,विनंती कुलकर्णी, सुवर्णाताई शिवपुरे, धनंजय साठे,अरुण तोडकर, बाळासाहेब खान यांची जिल्हा निवडणूक समिती म्हणून निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ,नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments