शहीद दिन व संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर.
108 रक्तदात्यांचे रक्तदान
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शहीद दिन आणि संविधान दिन या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून जी पी सोशल फाउंडेशन च्या वतीने आसरा चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 108 रक्तदात्यांनी रक्तदान करून संविधान व शहिदांच्या प्रती आदरांजली वाहिली. शहीद जवानांच्या स्मरणार्थ आणि भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन छत्रपती ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष व जीपी सोशल फाउंडेशनचे संस्थापक इस्माईल मकानदार यांनी केले होते.
आसरा चौक येथे सकाळी नऊ वाजता भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन 26 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते तर विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे, निखिल भोसले नितीन भोपळे छत्रपती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके कार्याध्यक्ष गजानन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या रक्तदान शिबिरास सोलापूर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
यावेळी बाबा शेख रियाज शेख रियाज बागवान अल्ताफ मुल्ला असिफ शेख युवराज गायकवाड अजीम मकानदार मुस्तकीम शेख अली शेख जुल्फी कर शेख बालाजी वाघे रशीद बागवान हाजी शेख आदी उपस्थित होते.

0 Comments