जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” अभियान- सिईओ जंगम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम दि. 19 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम दि. 19 नोव्हेंबर 2025 ते दि. 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापर्यंत पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्याचे सुचना केल्या आहेत. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करून घेणेत यावी.
या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण व स्वच्छतेबाबत जनजागृती करणेत सुचना दिले आहेत.
ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी सूचना देणेत यावेत. जिल्हा स्तरावर उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालये करणारे ग्रामपंचायतीना प्रोत्साहित करणेत येणार आहे. तसेच सार्वजनिक शौचालय उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायती चे सरपंच व पंचायत अधिकारी यांचा विशेष गौरव दिनाक 10 डिसेंबर 2025 रोजी करणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र काढून या सुचना दिलेले आहेत.
तालुक्यातील सर्व ना दुरुस्त सार्वजनिक शौचालयाची माहिती तालुका स्तरावर संकलित करणेत यावी. ग्रामपंचायत स्तरावर १५ वा वित्त आयोग मध्ये दुरुस्ती साठी राखून ठेवलेला निधी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती साठी वेळेत खर्च करणेत येणार आहे. या अभियानात कुठल्याही परिस्थिती हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेणेत यावी. अशाही सुचना सिईओ जंगम यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूचना तालुका स्तरावरून करणे बाबत सुचना दिले आहेत.
चौकट
मोहिम हालगर्जी पणा करणारे कर्मचारी यांचे वर कारवाई - सिईओ कुलदीप जंगम
मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानाची तपासणी करताना सार्वजनिक शौचालय दुरुस्ती मोहिमेची दखल घेणेत येणार आहे. गुणांकन देताना याचा विचार केला जाईल. नवीन बांधून बंद असलेली शौचालये सुरू करा. वीजेची व्यवस्था करा. ज्या ग्रामपंचायती हालगर्जी पणा करतील त्यांचे वर कारवाई करा. तसे अधिकार गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. अशाही स्पष्ट सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले आहेत.
सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे.
चौकट
ग्रामपंचायतीचे १५ वा वित्त आयोग निधीतून दुरुस्ती - प्रकल्प संचालक अमोल जाधव
जिल्हातील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींनी १५ वा वित्त आयोगाचे आराखड्यात दुरुस्ती साठी तरतुद केली आहे. तरतुद करूनही खर्च न करणारे ग्रामपंचायतींचा आढावा सिईओ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर घेणेत येणार आहे.

0 Comments