Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकक स्थापना दिवस साजरा

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकक स्थापना दिवस साजरा




वडाळा (कटूसत्य वृत्त):-  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना एकक स्थापना दिवस रक्तदान शिबिर आयोजनाने उत्साहात संपन्न झाला. सदरील रक्तदान शिबिराचे आयोजन लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या रासेयो एकका मार्फत करण्यात आले होते. सदरील शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयातील वैश्विक दाता  रक्तगट असणाऱ्या मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. संजय सिरसट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, सिद्धेश्वर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. एच. के. गलियाल, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे, महाविद्यालयातील सन्माननीय प्राध्यापक वृंद आणि रासेयो स्वयंसेवक यांची उपस्थिती होती. सदरील रक्तदान शिबिरात लोकमंगल शैक्षणिक संकुलातील ६० युवा रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य योगदान देऊन  राष्ट्रकार्य बजावले. रक्तदान शिबिराच्या समारोपप्रसंगी सिद्धेश्वर रक्तपेढी सोलापूर यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी सिद्धेश्वर रक्तपेढीचे सर्व पदाधिकारी, रक्तदाते आणि स्वयंसेवकांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली. सदरील शिबिराच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, रासेयो कार्यक्रमाधिकारी, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. 
Reactions

Post a Comment

0 Comments