लोकवर्गणीतून टेंभुर्णी शहरात सुरक्षेची नवी सुरुवात..... सुरजा बोबडे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत टेंभुर्णी ग्रामपंचायतीने लोकवर्गणीच्या माध्यमातून गावात एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. गावातील गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ परिसरात तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कामे हाती घेण्यात आली अशी माहिती टेंभुर्णी सरपंच सौ सुरजा बोबडे यांनी दिली
या उपक्रमासाठी नागरिकांच्या लोकवर्गणीमधून जमा झालेल्या निधीतून रु. २,५१,००० इतक्या धनादेश कॅमेरे बसविणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी सांगितले
टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने टेंभुर्णी सरपंच सुरजा बोबडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ,या अभियानासाठी शक्य तितक्या प्रमाणात राजकारण बाजूला ठेवून टेंभुर्णी शहरातील विकासासाठी व टेंभुर्णी डिजिटल करण्यासाठी
लोकवर्गणी. द्यावी, जेणेकरून गावातील महत्वाच्या व अत्यंत गरजेच्या कामांना सुरवात करता येईल.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे, व टेंभुर्णी ग्रामसेवक संजय साळुंखे उपस्थित होते
0 Comments