Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप




टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील सिना नदीच्या काठावरील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि सिना नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. सलग 125 ते 150 मिलिमीटर पावसामुळे दारफळ(सिना), वाकाव, निमगाव(मा), रिधोरे, पापनस यांसह जवळपास 25 ते 30 गावे पाण्याखाली गेली असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहेत.

या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांसाठी छोटासा खारीचा वाटा उचलला आहे. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी निधी गोळा करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या उपक्रमांतर्गत सिना नदीच्या काठच्या 15 ते 20 गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला व मदत पोहोचवण्यात आली.

या मदत कार्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी माढा  अविनाश चंदन, राज्याध्यक्ष उप कृषी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सहाय्यक कृषी अधिकारी संघटना विशाल गावडे तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

कृषी विभागाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या कठीण काळात इतर सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी देखील पुढे येऊन पूरग्रस्तांना मदतीचा खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments