Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न.

 जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न.


 

सोलापुर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्लीमहाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये तिस-या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर स्थानिक न्यायालय तसेच सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 45669 प्रलंबित प्रकरणे आणि 48413 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 94082 प्रकरणे लोकआदालती मध्ये ठेवण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालत सोलापूर जिल्हयातील एकुण 18,634 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण रक्कम रु. 1015015783/- इतके मुल्य असणा-या प्रकरणांमध्ये सांमजस्याने तडजोड करण्यात आली.

सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन  प्रमुख जिल्हा न्यायाधीशसोलापूर तथा अध्यक्षजिल्हा विधी सेवा प्राधिकरणसोलापूर मनोज शर्मा, यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश योगेश राणेजिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग रजपूतसोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधवमहाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य  मिलिंद थोबडेसोलापूर महानगरपालिका उपायुक्त  आशिष लोकरेभारतीय स्टेट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक संदीप झोडगे व विधीज्ञ व्ही. एन. देशपांडेबँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल अधिकारी संजिवकुमार व विधीज्ञ विनोद कांबळे तसेच जिल्हा न्यायालय प्रभारी प्रबंधक  मुकुंद ढोबळेविधीज्ञपक्षकार आदी उपस्थित होते.

तसेच सदर लोकअदालतीमध्ये विविध बँकवित्तिय संस्थासोलापूर महानगर पालिकापंचायत समिती दक्षिण सोलापूरबीएसएनएलमहाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीशहर वाहतूक शाखातसेच विविध पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी सहभाग नोंदविला

 

सदर लोक आदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मल्हार शिंदेअधिक्षक श्शमशोद्दीन नदाफतसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी वृंदतसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी   माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्रधिकरण सोलापूर   यांनी दिली.

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी दि. 09 सप्टेंबर 2025 ते दि. 12 सप्टेंबर 2025   या कालावधीमध्ये सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये एकुण 4887 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

 

सदर लोकन्यायालयाची मुद्देसुद माहिती खालीलप्रमाणेः

 

प्रलंबित प्रकरणे - एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे -47095,  एकूण तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे - 4058

प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम - 716860456

 

दाखलपूर्व प्रकरणे

 

एकूण ठेवलेली दाखलपूर्व प्रकरण – 57194 ,  एकूण तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे - 14576

 दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्कम-  298155327

ऑनलाईन व व्हाट्सअप च्या मदतीने तडजोड प्रकरणे – 03 , तडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे - 19

 

जिल्हा / तालुका निहाय प्रकरणांची माहिती  एकूण प्रकरणांची माहिती :

 

तालुका विधी सेवा समितीचे नांव-  सोलापूरएकूण तडजोड झालेली प्रकरणे – 10130,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 548192708.00

 

तालुका विधी सेवा समितीचे नांव-

अक्कलकोट एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 1732,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 10656171.00

बार्शीएकूण तडजोड झालेली प्रकरणे – 3871,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 268741272.00

माढा एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 49,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1494795700

मोहोळ  एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 107,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1004350100

माळशिरस - एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 793,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1806891200

मंगळवेढा - एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 468,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1987371500

पंढरपूरएकूण तडजोड झालेली प्रकरणे – 264,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 6951556600

करमाळा - एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 653,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 3902535300

सांगोला - एकूण तडजोड झालेली प्रकरणे – 567,  एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1595062800

एकूण-  एकूण तडजोड झालेली प्रकरणे-  18634 , एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम- 1015015783. 00

 

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्लीमहाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणमुंबईयांच्या निर्देशनाप्रमाणे दि 13 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्हा न्यायालय अंतर्गत सर्व तालूका न्यायालयात लोकआदालतची यशस्वी सांगता झाली. या लोकआदालती मध्ये अनेक विभक्त कुंटुब एकत्रित आले. अशा प्रकारे विभक्त कुटूंबास एकत्र आणुन दुभंगलेला संसार जुळविण्यात आले.

 

 यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार दिपाली (काल्पनीक नांव) हिने तिच्या पत्ती विरुध्द न्यायालयामध्ये माहे जानेवारी 2024 मध्ये खटला दाखल केला. दिपाली ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील असून पती रितेश हा विजयपूरकर्नाटक राज्य येथील आहे. त्यांचा विवाह हा माहे जून 2017 रोजी विजापूर येथे अगदी थाटामाटात संपन्न झाला. सदर पती-पत्नी यांचा संसार हा आनंदाने होत होता. त्यांना दोन मुली व मुलगा तीन अपत्ये झाली उभयंतामध्ये हुंडयाच्या कारणावरुन वादविवाद व भांडणतंटा करणेशिवीगाळ करणेमारहाण करणेस्वयंपाक तुला नीट करता येत नाही या कारणाहून दोघांच्या मध्ये दरी निमार्ण झाली. त्यामुळे पत्नी ही माहेरी राहत होती. सदरचे प्रकरण हे लोकआदालत मध्ये ठेवण्यात आले व उभयंताला समजावून सांगून मुलांच्या भविष्या बद्दलची परिस्थिती सांगीतली. यामुळे पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार झाले. यात अर्जदारा तर्फे अॅड. संतोष राठोड तर सामनेवाला तर्फे अॅड. इरेश स्वामी सदरचे प्रकरण मिटविण्याकरीता प्रयत्न केले. सदरचे प्रकरण हे मा.न्यायाधीश श्रीमती ज्योती पाटील यांचे पॅनलवर ठेवून सांमजस्याने मिटविण्यात आले.

 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार अनिता (काल्पनीक नांव) रा. सोलापूर हिने पती प्रसन्न (काल्पनीक नांव) यांच्या विरुध्द न्यायालयामध्ये माहे फेब्रवारी 2024 मध्ये खटला दाखल केला. पत्नी अनिता व प्रसन्न यांचा प्रेमविवाह हा जून 2016 रोजी सोलापूर येथे झाला. विवाहानंतर उभयंताना मुलगा झाला. पती-पत्नी एकमेकांवर अतिशय प्रेम करत होते. पती हा सोलापूरातील एका नामांकीत हॉस्पीटल मध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. पत्नी ही घर काम करते. पत्नीचे व सासूचे शुल्लक कारणावरुन वारंवार भांडण तंटे होत होते. हे भांडण खूपच विकोपाला गेले. त्यामुळे दोन्ही नात्यांमध्ये वितृष्ठ निर्माण झाले. पतीने पत्नीला घरातून हाकलून दिले. दोघेही विभक्त राहू लागले. सदरचे प्रकरण हे लोकआदात मध्ये उभयंताला समजावून सांगून मुलांच्या भविष्या बध्दलची परिस्थिती सांगीतली. यामुळे पती-पत्नी एकत्र राहण्यास तयार झालेयात अर्जदारा तर्फे अॅड. संजय सदाफुले तर सामनेवाला तर्फे बी.एस. वाघमारेव अॅड. सुरवसे यांनी काम पाहिले. सदरचे प्रकरण हे मा. न्यायाधीश श्रीमती. ज्योती पाटील यांचे पॅनलवर ठेवून सांमजस्याने मिटविण्यात आले.

 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार प्रियंका (काल्पनीक नांव) हिचा विवाह प्रविण याचेसोबत सन 2012 मध्ये झाले. विवाहा नंतर त्यांना तीनही मुली झाल्या त्यामुळे पती व पत्नीयामध्ये सारखे वादभांडण होत होते. सासू व सुन यांच्या सारखे भांडण तंटे होउ लागले. पती हा पुण्यामध्ये व्यवसाय करत होता. घरातील वादामुळे व्यवसायावर प्रचंड नुकसान होवू लागले. भांडण मिटविण्यासाठी त्यांनी समजामध्ये बैठही घेतली पण त्याचाहि काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पत्नी प्रियंका यांनी न्यायालयामध्ये पती विरध्द कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार खटला दाखल केला. सदरचे प्रकरणे हे आजच्या लोकअदालतीमध्ये मा. न्यायाधीश श्रीमती. ज्योती पाटील यांचे पॅनलवर ठेवण्यात आले. त्यांना मुलांच्या भविष्याबाबतची जाणीव करुन देण्यात आली. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद संपुष्टात आले. लोक आदालतच्या दिवशी दुपारी वाजताच पत्नी आपल्या पतीसोबत पुणे येथे नांदावयास गेली. यात अर्जदारा तर्फे अॅड. विलास भाबेरे तर सामनेवाला तर्फे एस. व्ही. गेंटयाल होते. सदरचे प्रकरण तडजोडीकरता पॅनल विधीज्ञ श्रीमती. स्वाती राठोड यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.    

Reactions

Post a Comment

0 Comments