Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वेरीमध्ये रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न

 स्वेरीमध्ये रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अल्युमिनि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी अभियंता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. 
             शिबिराचे उदघाटन मुंबई च्या दास ऑफशोअर लिमिटेडचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे सचिव डॉ. सूरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी. डी. रोंगे, स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, इतर विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वर्ग तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे या उपक्रमात तब्बल २७२ ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य असे योगदान दिले. सदरचे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे रक्तदान शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध पार पडले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजहितासाठी रक्तदानासारख्या उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अविनाश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्राध्यापक वर्ग यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी मोलाची साथ दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments