Hot Posts

6/recent/ticker-posts

पहिल्या टप्प्यात 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अडीच हजार कोटी जमा

 पहिल्या टप्प्यात 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अडीच हजार कोटी जमा 


कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन   
 
मराठवाड्यावर आस्मानी संकट ओढवले असताना महायुती सरकारमधील मंत्रीआमदारकार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष मदत करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत मुंबईत बसून वायफळ बडबड करून आपल्याला शेतकऱ्यांचा किती कैवार आहे असा आव आणत आहेत अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुती सरकारकडून आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यातील अडीच हजार कोटींची मदत 32 लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून यावेळी कोणतेही निकष न लावता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही श्री. बन यांनी सांगितले.   
यावेळी श्री. बन यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यादरम्यान चक्क कारपेटवर उभे राहून पाहणी केल्याची आठवण करून देत राऊतांवर पलटवार केला. शेतकऱ्यांचे दुःख कारपेटवरून दिसत नाहीतर ते प्रत्यक्ष बांधावर चिखलात उतरल्यानंतर जाणवते. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत आणि पाहणी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरलातूर दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपंकजा मुंडे  हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटत आहेत. भाजपा आणि महायुती सरकारचे मंत्री चिखलात उतरूनबांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.    
अतिवृष्टीमुळे मराठवाडा पाण्याखाली आहे मात्र राऊतांना शेतकऱ्यांचे दु:ख दिसत नाही. त्यांना फक्त विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे वाटते असा टोला श्री. बन यांनी लगावला. तुमचे आमदार–खासदार कुठे आहेतखासदार ओमराजे निंबाळकर सोडले तर एकही जण शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला नाही अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.  
राऊतांना शेती कळत नाहीफक्त प्लॉट कळतात !
संजय राऊतांना शेतीतले काही कळत नाहीत्यांना फक्त प्लॉट माहिती आहेत. अलिबागचे प्लॉट हडप करण्यातशेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात त्यांना रस आहे. पण शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्यांचे प्रेम शेतीवर नाहीतर प्लॉटवर आहे अशी बोचरी टीका श्री. बन यांनी केली. 
उद्धवजींना लंडनवारी प्रिय – शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे जड
मराठवाडा तीन दिवसांपासून संकटात आहे. आता उद्धव ठाकरे चौथ्या दिवशी दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धवजींना लंडनवारी करायची आहे असे सांगितले असते तर लागलीच पहिल्याच दिवशी निघाले असते. आमचे देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना सगळीकडे फिरून शेतकऱ्यांना आधार देत होते असेही त्यांनी नमूद केले.  
Reactions

Post a Comment

0 Comments