जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय डोके यांची निवड
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अखिल महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी तांदुळवाडी तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय विश्वंभर डोके यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी अखिल महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जाळे असणाऱ्या या अखिल महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीम शहा यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्ष या पदासाठी तांदूळवाडी तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय विश्वंभर डोके यांची नियुक्ती केली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.२०१७ पासून असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चालू असणारे प्रयत्न व यातून बांधकाम कामगार लाभार्थीचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. दत्तात्रय डोके यांनी बांधकाम कामगार विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आजपर्यंत डोके यांनी प्रयत्न केलेला असून त्याचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना होताना दिसत आहे. या त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे संचालक विजय पवार, जनार्धन मिले, तानाजी पाटील, उद्धव मिले, प्रमोद निंबाळकर, विलास पाटील,अमोल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना दत्तात्रय डोके म्हणाले की, ग्रामीण भागातील असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले.
0 Comments