Hot Posts

6/recent/ticker-posts

खाकी वर्दीतील दर्दी कवी

खाकी वर्दीतील दर्दी कवी  

मागच्या वर्षी लिहलेली ही 

मजेशीर अशी कविता 

नक्कीच आपणास आवडेल मित्रांनो...


पहिल्या पावसात मी आणि ती...


पहिला पाऊस आणि ती

नकळत अंथरुणाला खिळते 

भीत भीत माझी नजर

किचन कडे वळते


पाहून कपड्यांचा ढिगारा

धडकी भरते मला 

आपोआपच अवगत होते 

कपडे धुण्याची कला


पावसासोबत सुरू असतो

बाहेर गारांचा मारा

डोळ्यासमोर दिसतो 

खरकट्या भांड्यांचा ढिगारा


पोरांचं आवरता आवरता

तोंडाला येतो फेस

बरी वाटते तेव्हा मला

SRPF ची मेस


कधी खारट कधी तिखट

फोडणी देतो भेंडीला

करताना कसरत सारी

जीव येतो रडकुंडीला


सुरू होते अचानक 

थंडी तापाची व्याधी

पहिल्या पावसात ती आणि मी

भिजलोच नाही कधी

✍✍✍✍✍

कवी आपलेच

पोलीस उपनिरीक्षक 

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो:- 8424043233



Reactions

Post a Comment

0 Comments