आरोग्य मंत्री सावंतांचा ६. ५ हजार कोटींचा घोटाळा
.jpg)
सोलापूर(कटूसत्यवृत्त):-आदिवासी मागासवर्गीयांच्या दूध भोजन भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिके मध्ये भ्रष्टाचार करण्याचेही सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणान्या सुमीत व बीव्हीजी या कंपनीला या पद्धतीने टैंडर दिले. त्याद्वारे आरोग्यमंत्री यांनी साडेसहा हजार कोटी पोटाचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. (ईडी) बारामती अॅग्रो कंपनीवरील कारवाईनंतर पवार यांनी सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील हसन मुंश्रिफ यांच्यावर दूध भोजन प्रकरणात पवार यानी पहिल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. पाठोपाठ सोमवारी दुसन्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधत आरोग्य विभागातील भ्रष्टाचारा सम्बधी आरोप केले पवार म्हणाले, 'कोला फंड देण्यासाठी बीजी आणि सुमीत कंपनीवर मेहरबानी दाखवली जात आहे. समान व्यक्ती असून नियम कसे वळवण्यात आले टेंडर डिझाइन करू वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील लोकांनी हजार कोटींचा पोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केला असून राज्यला भिकारी केल्याचा आरोपही पवार यांनी केला.
खेकडा राज्याला पोखरतोय
तानाजी सावंत यांनी 'खेकड्याने पोखरल्याने गळती लागते असे विधान केले होते. या विधानावरून पवार यांनी सावंत यांना धारेवर धरले पवार म्हणाले 'सावंत यांच्याकडून रुग्णवाहिका प्रकरणात सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.खेकडा वळवळ करतो.धरण पोखरत बसतो. लोकांचे लक्ष कमी झाले की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला
रोहित पवारांचे आरोप
• आरोग्यमंत्री हाफकिन संस्था ओळखण्यात गल्लत करतात,पण पैसे खाण्यात गल्लत करत
नाहीत. खरेदीसाठी ना टेंडर काढण्यात आले.• मार्केट रेटपेक्षा दुप्पट किमतीने रुग्णवाहिका खरेदी करण्यत आल्या. त्यामुळे चौकशी हवी. • सिटिजी एसएसजी या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले.
खुलासा होणे गरजेचे आहे.
पारदर्शकपणेच खरेदी निविदा : आरोग्य विभाग
मुंबई। आपत्कालीन सेवा पुरवण्यासाठीच्या रुग्णवाहिका खरेदीसंदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम धोरणानुस्वार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबवण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार • किंवा अनियमितता झालेली नाही. प्रशासकीय मान्यतेवेळी विचारात घेण्यात आलेले तांत्रिक विनिर्देश १० वर्षे जुने असल्यामुळे ते गरजेनुसार अद्ययावत करण्यात आले मे सुमीत फॅसिलिटीज लिमिटेड मे बीजी इंडिया लिमिटेड मे सॅनिटेरियो एस.एस यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला आहे. आयुक्त आरोग्यसेवा यांच्या स्तरावरील समितीमार्फत प्रथम वाटाघाटी करण्यात आली. सुधारित प्रशासकीय मान्यता मार्च २०२४ रोजी देण्यात आली आहे.
0 Comments