फडणवीस आणि सातपुते अडचणीत येण्याची शक्यता
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी मोची समाजाचा प्रश्न फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यावर फडणवीस यांनी गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन दिले, त्यामुळे फडणवीस आणि सातपुते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण काँग्रेसने हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. त्यात पत्रात लोंढे यांनी गृहमंत्री फडणवीस यांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
0 Comments