Ads

Ads Area

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

 श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- 31 जानेवारी 2024 रोजी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी विविध नृत्यकला सादर केल्या.

                 या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून शिवरत्न शेटे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाच्या वेळी पुरातन काळातील तुतारी हे वाद्य वाजवून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.  वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री सिद्धरामेश्वर यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शिवरत्न शेटे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे सदस्य  राज शेखर येळेकर सर सर यांच्या हस्ते सिद्धेश्वर संकुलाचे आधारस्तंभ अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सिद्धरामेश्वरांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील विद्यार्थी अथर्व यादव तर आदर्श विद्यार्थिनी सुकृता कुलकर्णी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अतिथी शिवरत्न शेटे सर यांनी पालकांचे उदबोधन केले. ते पालकांना म्हणाले की प्रत्येक घराघरात शिवाजी घडावा असे वाटत असेल तर प्रथम प्रत्येक स्त्री जिजाऊ बनणे गरजेचे आहे. आजी आजोबांनी संस्कार गोष्टी आपल्या नातवंडांना सांगाव्यात. सर्वप्रथम पालकांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी आपल्या उदबोधन पर भाषणात सांगितले.

            राष्ट्रीय संघातून विजयी होऊन आलेले शाळेचे क्रीडा शिक्षक श्री नेताजी पवार सर यांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या वार्षिक स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत विविध कलाविष्कार बालगोपालांनी सादर केले.   या स्नेहसंमेलनात शिवाजीचा राज्याभिषेक हा नृत्यविष्कार प्रेक्षकांचा लक्षवेधक नृत्यविष्कार ठरला.

                    इयत्ता पहिली ते चौथी या वर्गामधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवला.  या सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आपल्या नृत्याविष्कारातून दिला.शालेय शिक्षण समितीचे सदस्य राज शेखर येळीकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ  रत्न श्री तळे मॅम शाळेच्या पर्यवेक्षिका सृष्टी राठोड मॅम यांनी या बालगोपालांचे कौतुक केले.

                   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सो सुनिता खडाखडे यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो रत्नश्री तळे मॅम यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सृष्टी राठोड मॅम यांनी केला.  हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख  सौ नूतन  थोरवडे, पुनम वटे व ऐश्वर्या अरकल यांनी नियोजन केले. व सर्व शिक्षक वृंदांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close