Hot Posts

6/recent/ticker-posts

येरवडा पोलिसाकडून सर्वधर्म समभावाचे दर्शन

येरवडा पोलिसाकडून सर्वधर्म समभावाचे दर्शन


येरवडा ( प्रविण शेंडगे ) पुणे शहरातील येरवडा पोलिस आणि शाहदावल बाबा दर्गा कमिटीच्या वतीने रविवारी भजन, किर्तन , वासंतिक ओटी पुजा आणि रोजा इफ्तारचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उप-आयुक्त रोहिदास पवार, एसीपी किशोर जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख , पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे,उपस्थित होते.समाजातील सर्वधर्म समभाव आणि ऐकोपा कायम राखण्यासाठी येरवडा पोलिसांकडून भजन, , वासंतिक ओटी पूजा आणि इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित सर्व धर्मातील नागरिकांनी सामाजिक ऐक्याची भूमिका घेऊन एकमेकांना सहकार्याची आवश्यकता आहे. त्यातूनच शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत होणार आहे.सर्व जाती धर्माचा नागरिकांनी आदर केला पाहिजे असे मत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments