Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात महाराष्ट्र सरकार प्रमाणे

 केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात महाराष्ट्र सरकार प्रमाणे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन मानधन द्यावे.
                                                      - स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र माने गुरूजी.

पुणे (नासिकेत पानसरे):- भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव्हे देशाचे - जगाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार फक्त महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो. इतर राज्यात दिला जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात महाराष्ट्र शासनाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन मानधन द्यावे अशी मागणी ९२ वर्षाचे स्वातंत्र्यसैनिक, दलित मित्र हरिश्चंद्र माने गुरूजी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघ (रजि.) यांची सर्वसाधारण सभा पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हरिश्चंद्र माने गुरूजी यांनी ही माहिती दिली. याबाबत रामदास आठवले यांच्याशी सातारा येथील कार्यक्रमात बोलणी झाली असून त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. दिल्ली येथे एक बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे असे माने गुरूजी यावेळी म्हणाले. १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दलित मित्र (समाजभूषण) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. तुम्ही आमदार-खासदारांपेक्षा मोठे आहात त्यामुळे तुम्हांला मानधन दिले पाहिजे हा तुमचा हक्क आहे असे जोशी यांनी सांगितल्याचे माने गुरूजी म्हणाले. याबाबत पुन्हा जोशी यांना भेटूया याकडे माने गुरूजी यांनी लक्ष वेधले. 
मावळते अध्यक्ष नरोत्तम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले त्यांनी संघाच्या मागण्याबाबतची माहिती सदस्यांना दिली. राज्यात समाजभूषण भवन बांधूया असे चव्हाण म्हणाले. शासनाने दलित या शब्दाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संघाच्या नावात समाजभूषण असा बदल करावा का? याबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भिकाचंद मेमजादे, शंकर खूने, प्रकाश कुंभे, फुलसुंदर महाराज आदींची भाषणे झाली.
संस्थापक योगेश वागदे यांनी संघाच्या मागण्याबाबतचा आढावा घेतला. सभेचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार निलावार यांनी केले. याप्रसंगी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्याता आली. यामध्ये अध्यक्षपदी योगेश वागदे, कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार निलावार, सरचिटणीस भूषण दडवे, कोषाध्यक्ष वृषाली वाघचौरे यांची निवड करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments