कोरोना पूर्वी च्या दैनंदिन रेल्वे गाड्या पूर्ववत चालू कराव्यात

रेल्वे प्रवाशांच्या तात्काळ तिकिट व पासेस ची गैरसोय टाळावी ;भारतीय जनता पार्टी कुर्डुवाडी शहराध्यक्षांची मागणी
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कोरोना १९ साथ प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या मध्य रेल्वेच्या एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्यांच्या सुविधा पुनश्च सुरळीत चालू करून एम.एस.टी मंथली सीझन,तिकीट पास सुविधा चालू कराव्यात अशी मागणी कुर्डूवाडी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर बागल यांनी देवूसिंह चौहान केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री भारत सरकार, व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रंजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शायनिंग महाराष्ट्र महा प्रदर्शनाचा समारोप समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून फलटण येथे केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान आले होते यावेळी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली माढा लोकसभा मतदार संघातील कुर्डूवाडी हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आहे. इथून पुणे-विजापूर, मुंबई-अहमदाबाद,बेंगलोर-हैदराबाद,कन्याकुमारी- नांदेड,लातूर-पणजी,गोवा-बेळगाव आदी भागाकडे जाणाऱ्या विविध प्रवासी गाड्या थांबतात.सदर गाड्या कोविड महामारी मुळे दि.२० मार्च २०१९ पासून बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हा पासून बंद असलेल्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यापैकी काही प्रवासी गाड्या मेल एक्सप्रेस चालू करण्यात आलेल्या आहेत परंतु त्यांचे वेळापत्रक माढा मतदारसंघातील करमाळा व माढा तालुक्यातील जनते करिता सोयीचे नाही.कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरून सकाळी ५:३० वा. नंतर १२: च्या अगोदर एकही मेल-एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वेगाडी एकही उपलब्ध नाही.कुर्डुवाडी शहर परिसर माढा शहर परिसर येथून शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांना व व्यापारी तसेच शासकीय निम शासकीय तसेच खाजगी कर्मचारी तसेच लहान मोठे व्यापारी मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णांना जिल्हा मुख्यालय सोलापूर शहरांमध्ये जाण्यासाठी फार अडचणीचे होत आहे.दौंड-पुणे येथील नागरिकांना एम.एस.सी सिजन तिकीट पास सुविधा बंद आहेत.त्या लवकरात लवकर चालू कराव्यात तसेच ५:३० नंतर सकाळी ८ : ०० च्या दरम्यान पूर्वी प्रमाणे मुंबई-विजापूर एक्सप्रेस पुणे-सोलापुर पॅसेंजर,इंद्रायणी एक्सप्रेस, या गाड्या पूर्ववत चालू करण्याबाबत योग्य ते आदेश संबंधित विभागाला द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विक्रम पावसकर,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार जयकुमार गोरे,माळशिरस चे आमदार राम सातपुते,सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,माढा तालुकाध्यक्ष योगेेश बोबडे,तालुका सचिव जयसिंंग ढवळे,युवक तालुकाध्यक्ष उमेश पाटील,महिला शहराध्यक्ष प्रतिक्षा गोफणे,करण भगत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माढयाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर व केंद्रीय दूरसंचार राज्य मंत्री यांनी या निवेदनावर तात्काळ केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निर्णय घेऊ असे शहराध्यक्ष शंकर बागल यांना आश्वासन दिले.
0 Comments