माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित

मुंबई (कटूसत्य वृत्त): अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपने केला आहे.
मात्र विधानभवनात केलेल्या गैरवर्तनाबद्दल महाराष्ट्र विधीमंडळातून भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी विधानभवनातून निलंबन झाले आहे. निलंबित झालेल्या बारा आमदारांमध्ये संजय कुटे, राम सातपुते, अतुल भातखाळकर, अभिमन्यू पवार, जायकुमार रावळ, नारायण कुचे, गिरीश महाजन, आशीष शेलार, पराग आळवणी,योगेश सागर, कितरिकूमार भांगडिया, हरिष पिंपळे यांचा समावेश आहे.
0 Comments