गिरझणी ग्रामपंचातीच्या वतीने जिवनाश्यक वस्तू तर जनसेवेकडून मास्क वाटप
अकलूज( प्रतिनिधी) गिरझणी ग्रामपंचायतीच्या वतीने १५टक्के निधीतून सुमारे २०० मागासवर्गीय कुठूबांना ४० हजार रुपये किंमतीचे जिवनाश्यक वस्तु सॅनिटायझर तर जनसेवा संघटनेच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या पुढे उदरनिर्वाहाचे संकट आले आहे.अशातच ग्रामपंचायतीच्या १५ टक्के मागासवर्गिय निधीतुन मागासवर्गिय कुठूबांना जिवनाश्यक वस्तु देण्याची तरतुद असल्याने प्रशासनाने तसे आदेश पारीत केले आहेत.गिरझणी ग्रामपंचायतीने प्रशासकीय आदेशाचे पालन करत राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहीते-पाटील व ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व शंकरराव मोहीते-पाटील बँकेचे चेअरमन सतिश नाना पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गिय कुठूबांना ४० हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.प्राथमिक स्वरुपात काही कुठूबांना माजी सरपंच विजय माने व मान्यवरांच्या हस्ते जिवनाश्यक वस्तु वाटपाचा प्रारंभ केला व गिरझणी परीसरातील सर्व मागासवर्गिय कुठूबांना साहीत्य पोहच करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर व जनसेवा संघटनेच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.शुभांगी जाधव,उपसरपंच सविता चव्हाण,अजिनाथ जाधव,ग्रामपंचायत सदश्य किशोर चव्हाण,रमेश पवार,अमोल साठे,महादेव साठे,पत्रकार नागेश लोंढे,पोलीस पाटील महेश गिरमे,मयुर माने,रमेश साठे,दादा साठे आदी उपस्थित होते.
साहीत्य खरेदी करणे घरोघरी पोहच करण्यासाठी ग्रामसेवक सुधाकर मुगुसकर,ग्रामपंचायत कर्मचारी उमेश साठे व राजु खुडे आदीनी परीश्रम घेतले.
0 Comments