Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर येथील आगारास कोट्यावधीचा फटका!

कोरोनामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर येथील आगारास कोट्यावधीचा फटका!

तुळजापूर : लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब (७.८९ टक्के)आणि हिमाचल प्रदेश (७.६९ टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.
गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.
दरम्यान, तुळजापूर -महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन काळात परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हयातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या तुळजापूर आगाराला 22मार्चपासुन आजपर्यत तब्बल ऐक कोटीचा तोटा झाल्याचं समोर आलं आहे.
तुळजापूर आगाराचा बसेसेच्या दररोज सुमारे 350 फे-या होतात. या सर्व फे-या रद्द करण्यात आल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकच्या प्रवेशध्दारावर असलेल्या तुळजापूर आगारातील दोन बसस्टँन्ड वर दररोज प्रचंड भाविकांनी, प्रवासी,ग्रामस्थांनी फुलुन गेलेले असते मात्र सध्या येथे स्मशान शांतता पसरली आहे.
येथे तुळजापूर आगाराच्या 90 व बाहेरच्या आगराच्या 90 व इतर राज्यातील पंधरा अशा बसेसच्या फेऱ्या असतात त्या बंद झाल्या आहेत.तुळजापूर आगारात 515 कर्मचारी कार्यरत आहेत.उन्हाळा सुट्टी काळात तर येथे दुप्पट गर्दी असते. याञा काळात यापेक्षा अधिक गर्दी असते या तीन महिन्याच्या कालावधीत परिवाहन व्यवसाय अतिशय उत्तम असतो.
दरम्यान,कोरोना आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे एस टी चाके बंद असल्याने पगारी कशा पध्दतीने कधी होणार याची चिंता एस टी कामगारांना लागली आहे. पगारी नाही झाल्यातर माञ एस टी कामगार कुंटुंबांना उपासमारीस सामोरे जावे लागणार असल्याने कोरोनाच्या फटक्यामुळे एस टी कामगार रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments