कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगोलावासीयांनी केली एकजूट.शहर शंभर टक्के बंद.
सांगोला (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण जिल्ह्याने प्रतिसाद दिला असून सांगोला शहरात आणि तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवून "गो कोरोना" गो कोरोना"चा नारा व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी दिला. कोरोना या विषाणूपासून बचाव आणि या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला शहरात नगरपालिका,सांगोला पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय,तसेच आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगोला शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहेत. सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकानी सतर्क रहावे, बाहेरून आलेल्या लोकांनी संबंधित गावातील पोलीस पाटील यांना कल्पना देवून योग्य वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग लोकांमध्ये जनजागृती करत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत,गर्दीत जाणे टाळले पाहिजे,मास्कचा वापर केला पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साद देताना सर्व जनतेने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घरी थांबून जनता करफु मध्ये सहभागी व्हावे ---डॉ .सीमा दोडमणी (तालुका वैद्यकीय अधिकारी)

0 Comments