जनतेच्या विश्वासावरच सामाजिक कार्य जोमाने- शरद मोरे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- आम्ही चुकीचे वागत नाही, आपणही चुकीचे वागू नका. प्रामाणिक काम करा यश मिळेल. शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून सात हजार लोकांना आरोग्य व इतर सोयी सुविधांचा लाभ मिळाला. जनतेच्या विश्वासावरच सामाजिक कार्य अधिक जोमाने करत राहीन, असे प्रतिपादन शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे यांनी केले.शिवप्रसाद उद्योग समुहाचे अध्यक्ष शरद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रसाद उद्योग समुहाच्या वतीने दहिगाव येथे नियोजन बैठकीचे आयोजिन करण्यात आले होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहातील वेगवेगळ्या उद्योगांची माहिती देण्यात आली. यामध्ये शिवप्रसाद फूडस अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस, शिवप्रसाद इन्फ्रा इंडस्ट्रीज, प्रथमेश मिल्क प्रोसेसिंग, एस.पी.जी. मल्टीस्टेट, प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स, शिवप्रसाद व्हेंचर्स, मुकुंद फुडस अॅण्ड मिल्क प्राडॅक्टस, शिवप्रसाद कॅटल फिड, शिवप्रसाद फाउंडेशन, शरद (बापू) मोरे मोटार वाहतूक संस्था, नमोः इटेबल्स, शिवप्रसाद अर्बन, एस.पी.जी. इन्शुरन्स असेल या सर्व योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.शेतकाऱ्यांकडून मिळालेल्या दुधाचे कोणकोणते व कशाप्रकारे उत्पादने तयार होतात. एस.पी.जी. मल्टीस्टेट, एस.पी.जी. इन्शुरन्सचा फायदा काय, शेतकऱ्यांसाठी कर्ज सुविधा, शिवप्रसाद फाउंडेशनमधून देण्यात येणारी आरोग्य सेवा याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी शरद मोरे यांनी नेहमीच शेतकरी, दूध उत्पादक व कष्टकरी वर्गासाठी केलेल्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली. यावेळी बैठकीस शिवप्रसाद दूध संघाचे सर्व सेंटर चालक, दूध उत्पादक, शेतकरी तसेच वाहन चालक-मालक, सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

0 Comments