Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावासमोर भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक, एक दुचाकी चालक गंभीर जखमी, दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर कारमधील तीन जण किरकोळ जखमी

 सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावासमोर भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक, एक दुचाकी चालक गंभीर जखमी, दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर कारमधील तीन जण किरकोळ जखमी 





दिनांक  ५  जानेवारी २०२६ रोजी सकाळी  दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर  शेटफळ  गावासमोर   मुंबई वरून सोलापूर येथे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवादी येथे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी तर  कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले असून सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून  डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून  कारमधील किरकोळ जखमी झालेल्या तीन जणांना शेटफळ येथील  शासकीय रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक  आणि मोडनिंब  महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातातील कार  आणि दुचाकी वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून  वाहतूक सुरळीत केली असून या अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नाव श्री युवराज बजरंग शिंदे वय ५५ वर्षे. रा. सिद्धेवादी ता मोहोळ जि सोलापूर असे आहे,सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री. पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री.संतोष खडके यांनी दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments