उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे - विक्रमसिंह शिंदे.
भाजप आपल्याला नवीन नाही.
कन्हेरगांव येथील गावभेट दौऱ्याप्रसंगी प्रतिपादन.
टेंभुर्णी/ (कटूसत्य वृत्त)
विक्रमसिंह शिंदे यांनी १९९५ विधानसभा निवडणुकीचा विषय सांगितला. ते म्हणाले की,त्यावेळी माजी आ.दादांनी छत्री चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.यामध्ये मोठ्या मताधिक्याने दादा निवडून आले होते.त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते.त्यावेळी दादांनी तालुक्यातील विकासाच्या विषयावर युती शासनाच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेऊन भीमा-सिना प्रकल्प मंजूर करून तालुक्यातील विकासाला चालना दिली.या माध्यमातून तालुक्यात हजारो एकर शेती बागायत झाली.अनेक विकास कामे मार्गी लागली होती.यामुळे भाजप आपल्याला नवीन नाही.माढा तालुक्यातील ऊर्वरीत विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजप मध्ये गेलो आहोत.दादांच्या माध्यमातून राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले.
कन्हेरगांव तालुका माढा येथे बुधवारी दि, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता गावभेट दौऱ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
यावेळी उपसरपंच लिंबाजी मोरे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी डोके , कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,अकोले खुर्द येथील संभाजी उर्फ गोटू पाटील,सरपंच श्रीकांत बनसोडे , माजी चेअरमन नागेश मोरे,सोमनाथ कदम, दादासाहेब खोचरे ,रामलिंग खोचरे, हनुमंत पाटील,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील,योगेश खोचरे, गणेश माने,समाधान चव्हाण, दशरथ चव्हाण,तुषार काशीद, रतिलाल केदार,सचिन माने,जोतीराम भरगंडे, रावसाहेब डोके, नागेश माने,सोमनाथ लोखंडे , अमोल मोरे,धनाजी माने, आप्पासाहेब कोळी,प्रकाश माने ,शिवाजी पाटील, विलास कदम, महादेव मोरे ,वैजनाथ चव्हाण ,किरण खोचरे, बिभीषण मोरे, विशाल पवार, शंभूराजे डोके उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच लिंबाजी मोरे व संचालक शिवाजी डोके यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रा. हनुमंत पाटील यांनी आभार मानले.

0 Comments