हिरकणी सखी मंच्याकडून दीपोत्सव साजरा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात व श्री तुळजाभवानी माता मंदिर या ठिकाणी भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता.
सदरचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
कार्तिक पौर्णिमेला धार्मिकतेत महत्व असून, यानिमित्त सालाबादाप्रमाणे न्यासाकडून यंदा हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून दीपोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्रिपूर पौर्णिमेनिमित्त त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी त्रिपूर वात लावली जाते. म्हणून हिरकणी सखी मंच्याकडून दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त व माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, खजिनदार स्मिता कदम, निकम, पल्लवी कदम, संगीता भोसले, सपना माने, सुवर्णा घाटगे, रूपा पवार, अनिता गडदे, सीमा जाधव, कोमल क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, तृप्ती बाबर, अन्नपूर्णा कलबुर्गी, कविता भोसले, कविता वाकडे यांच्यासह महिला वर्ग, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान न्यासाच्या यात्री निवास येथे रांगोळी साकारून लक्षदिपोत्सव करण्यात आला.

0 Comments