Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्साहात शुभारंभ

नातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्साहात शुभारंभ


 

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज ६७५ वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ह भ प गुरुवर्य मनोहर महाराज भगत यांच्या प्रेरणेतून नातेपुते येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी सुरुवात झाली. यावेळी कलश पूजन प्रतिमा पूजन, भगवान पांडुरंग प्रभू श्रीराम, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, ध्वज, दीप प्रज्वलन, ग्रंथ पूजन, हा सर्व पूजन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कलश पूजन नातेपुते नगरीच्या नगराध्यक्षा अनिता लांडगे व नंदकुमार लांडगे यांच्या शुभहस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,हनुमंत धालपे, विजयकुमार उराडे, प्रवीण काळे, राजेंद्र पांढरे, दत्तात्रय भाऊ उराडे, डॉ, विठ्ठल कवितके, अॅड. सुभाष लोणारी, डॉ. नरेंद्र कवितके, अॅड. धनंजय भांड,अक्षय भांड, सागर बिचुकले, दस्तगीर मुलाणी, समाधान माळी, संजय मामा उराडे, अनिल काळे, केशव पांढरे, किरण टकले यांच्या हस्ते पूजन सोहळा संपन्न झाला,यावेळी नातेपुते परिसरातील भजनी मंडळ व महाराज मंडळी तसेच अखंड हरिनाम सप्ताह समिती अध्यक्ष गणेश पागे, विनायकराव उराडे,गणेश कुचेकर, मंगेश दीक्षित, अमोल पाडसे,उमेश पोददार,अभिजीत म्हामणे, जालिंदर ठोंबरे,जयवर्धन चिंचकर, भगत महाराज सह भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments