Hot Posts

6/recent/ticker-posts

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

 अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई



 


 

 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर शहरालगत असणाऱ्या चिंचोली भोसे इसबावी येथील भीमा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या कटरच्या साह्याने कापून नष्ट करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली असून, ही कारवाई  प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, पंढरपूर मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, संजय खंडागळे, गणेश पिसे यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments