बिनविरोध नगरपंचायतीसाठी माजी आ. राजन पाटील यांचा सत्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा प्राजक्ताताई अजिंक्यराणा पाटील यांच्यासह १७ नगरसेवकांची बिनविरोध निवड केवळ औपचारिकता उरली आहे. या विजयाबद्दल माजी आ. राजन पाटील यांचे माजी आ. यशवंत माने यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, युवा उद्योजक श्रीकांत माने, प्रकाश चवरे, दीपक माळी, संतोष वाबळे, धनंजय रणवरे यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments