Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड कट्टयावर ब्रह्मांड सारेगमप लाईव्ह संगीत कट्टयाचा प्रथम वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 ब्रह्मांड कट्टयावर ब्रह्मांड सारेगमप लाईव्ह संगीत कट्टयाचा प्रथम वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न




ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांड कट्टयावर रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ब्रह्मांड लाईव्ह कट्टयाचा प्रथम वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या सात वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच सात शाखांपैकी एक लाईव्ह संगीत कट्टा मुझिशियन बरोबर सादर होणारा संगीत कट्टा.  या कट्टयाचे अध्यक्ष व गायक सावनकुमार सुपे यांनी ही हिंदी व मराठी गाण्यांची सांगितीक संध्या आयोजित करण्यात आली होती.
  कार्यक्रमाची सुरुवात ज्योती पांडे यांच्या बहुत प्यार करते या गाण्याने झाली. धीरे धीरे मेरे जिंदगी में या आशिष पांडे व ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमात रंग भरू लागला. अंजन दांडेकर, सुनिल कोकणे,शर्वरी प्रशांत यांनी जुन्या हिंदी गाण्याने बहार आणली. स्टॅनली सी एस यांचे प्रितीच्या चांदराती हे सुंदर गीत सादर केले. हिना,प्रदीप शिर्के,कुमार, राणी मेजारी ,प्राजक्ता संगवई, प्रियांका पाटील ,सुषमा घाग, ममता चौधरी यांच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. रामप्रसाद आंबेटकर यांनी येशील येशील राणी पहाटे पहाटे हे गाण सादर केल. तर संगीत विशारद व लाईव्ह संगीत कट्ट्याच्या सचिव गायत्री अय्यर  यांनी इन दुनिया में जीना हो तो हे बहारदार गाण सादर केल. कृष्णा बढे यांनी त्यांच्या दमदार आवाजात प्रतापगड चे युध्द हा पोवाडा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सावनकुमार सुपे व विशेष पाहुण्या कलाकार  इती कर सुमधुर आवाजात गाणी सादर केली. किशोर सकपाळ व कुमार यांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्याला भरभरून दाद दिली. प्राजक्ता संगवई यांनी सादर केलेल्या चंद्रा या चित्रपटातील लावणी गीताला रसिकांनी प्रेक्षागृह टाळ्या व शिट्यांनी दाद दिली. 
  कार्यक्रमाची सांगता विशेष अतिथी कलाकार शिवा शिंदे यांच्या  गाण्याने झाली रसिकानी त्याला नृत्य करून दाद दिली. या संपूर्ण लाईव्ह कार्यक्रमाला वादक कलाकार की बोर्ड वर देवा विश्वकर्मा व निकेश देवळेकर,ढोलक हॅडिन साॅनिक राकेश पालकर,ऑक्टोपॅडवर गजानन विश्वकर्मा तर पर्कषण वादक चेतन सकपाळ यांची सुंदर साथ लाभली. या कार्यक्रमात सुमधुर आवाजात  डाॅ. प्रतिक्षा बोर्डे यांनी निवेदन केले. ध्वनी व्यवस्था हेमंत चाळके यांची तर रविंद्र टिळकर यांनी व्हिडिग्राफी केली. गायक व वादक कलाकारांना  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्ह्य़ातील विविध सेल प्रकोष्ठ आणि विभाग अध्यक्षांच्या नियुक्ती यादी नुकतीच जाहिर झाली.  ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री.राजेश जाधव हे गेली २५ सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून हा अनुभव लक्षात घेता त्याची भाजप पक्षातर्फे  ठाणे शहर जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जाधव याची नियुक्ती ब्रह्मांड कट्टयास अभिमानास्पद बाब असून तिचे विशेष कौतुक म्हणून ब्रह्मांड कट्टयाचे अध्यक्ष महेश जोशी व ब्रह्मांड कट्टयाच्या संपूर्ण परिवारातील सदस्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्रह्मांड कट्टयावर आलेल्या रसिकांनी वैयक्तिक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
         या प्रसंगी संस्थापक राजेश जाधव यांनी असेच यापुढे देखील पक्षाच्या कामात व सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कामाचे योगदान राहिल असे प्रतिपादन केले.
       गायक सावनकुमार सुपे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments