माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार- आ. पाटील
माढा (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचे संकल्पनेतून गुरूवार दि.२०,२१,२२ ते रविवार दि.२३ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सहकार महर्षि गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कुल, वैराग रोड, माढा येथे माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२५ हा भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
त्यानिमित्ताने आमदार अभिजीत पाटील यांनी कार्यक्रमाची पाहणी करून स्टेज पूजन करण्यात आले यावेळी माढा शहरातील अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते.
कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान, शेतकरी प्रबोधन, स्थानिक कला सांस्कृतीचा जागर, मनोरंजन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करणेत आलेला आहे. या महोत्सवामध्ये अत्याधुनिक कृषी यंत्रसामुग्री, बी-बियाणे, खते, शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, जल व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग आदींची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, तज्ञांचे व्याख्यान, शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नोंदणी यांचाही समावेश असणार आहे.
सदर सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीट मिळणार असून लोककला, नृत्य, नाट्य कार्यक्रम, संगीत मैफिली, बालरंजन उपक्रम तसेच महिला उद्योजकांसाठी विशेष स्टॉल यांचा समावेश असणार आहे.
माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२५ या महोत्सवाच्या माध्यमातून माढा तालुक्यातील शेती, संस्कृती आणि स्थानिक उद्योग-व्यवसायांना नवीन दिशा मिळावी. तसेच तरूणाईला प्रेरणादायी, रोजगाराभिमुख संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रतिष्ठानाचा मुख्य हेतू आहे. या महोत्सवात सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, युवा वर्ग, उद्योजक, नागरीक व माढा पंचक्रोशितील ग्रामस्थ तसेच पाहुण्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदर महोत्सवाचे सौंदर्य वाढवावे असे आवाहन आमदार अभिजीत (आबा) पाटील साहेब आणि विठ्ठल प्रतिष्ठान यांनी केलेले आहे.
.png)
0 Comments