भाजपाच्या ठाणे शहर जिल्हा संस्कृतिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी राजेश जाधव यांची नियुक्ती
ठाणे (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्ह्यातील विविध सेल प्रकोष्ठ आणि विभाग अध्यक्षांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या असून ठाणे शहर जिल्हा सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. जाधव हे गेली 25 वर्षे ठाण्यात सामाजिक सांस्कृतिक काम नेटाने करत आहे. भाजपा पक्षात त्यांनी उपाध्यक्ष, एक भारत श्रेष्ठ भारत संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या आहेत. या काळात त्यांनी आंदोलने आणि निवडणुकीच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. एक भारत श्रेष्ठ भारत च्या माध्यमातून सर्व राज्यांचे स्थापना दिवस साजरे केले आहेत. ते काम लोकांपर्यंत व्यवस्थित पोचले तसे ब्रह्मांड कट्ट्याचे अठरा वर्षाचे कार्य याचीच पोचपावती म्हणून संस्कृतिक प्रकोष्ठ अध्यक्ष पद भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी सोमवारी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत तसेच सांस्कृतिक सेल च्या माध्यमातून हिरीरीने काम करणार असून पक्षाच्या विजयात संस्कृतिक विभागाचे मोठे योगदान राहिल, असा विश्वास श्री. राजेश जाधव यांनी व्यक्त केला.

0 Comments