शालेय कुराश स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची २१ सुवर्ण आणि १५ रौप्य पदकांची कमाई
पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत २१ सुवर्ण आणि १५ रौप्य पदकांची कमाई केली. सुवर्णपदक पटकावणारे २१ खेळाडूंची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत येथे झालेल्या या जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले खेळाडू खालील प्रमाणे - १४ वर्षे वयोगट मधुरेश जावळे, राजवीर अजुरे, आदित्य खाडे, निरंजन भोंडवे, वैदेही निकम, पूर्वी गायकवाड;
१७ वर्षे वयोगट - यश भोंडवे, मानस तरस, ओम पाटील, आदित्य खत्री, दिया जैन, वेदश्री भंगाळे, दूर्वा वाजे, वैष्णवी पाटील;
१९ वर्षे वयोगट - सुयोग सोनवणे, यश गायकवाड, दिविज पटेल, गौरंग वाघमारे, सई थोरात, शर्वरी भोंडवे, अल्फिया शेख यांनी सुवर्णपदक पटकाविले यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
रौप्य पदक पटकावणारे खेळाडू पुढील प्रमाणे १४ वर्षे वयोगट - तनिश भोंडवे, अंकुर वाजे, आयुष शिंगी, स्वरांजली कुलकर्णी, ध्वनी चऱ्हाटे, अनुश्री पालखे, १७ वर्षे वयोगट - आर्यन तुपे, माहीन शेट्टी, यश गायकवाड, श्रेया ढोरे, अन्वयी बिडवे, मृण्मयी पाटील, १९ वर्षे वयोगट - वंश सक्सेना, आयुष राजपूत, इशिता हर्णे; १७ वर्षे वयोगटात आराध्या जाधव हिने कांस्य पदक मिळविले.
प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा, क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments