आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांचा झाला सन्मान
देवाने माणसाची नव्हे तर माणसानेच देव आणि देवळाची निर्मिती केली आहे - आबा पांढरे
आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त मानव मंदिर पंढरपूर येथे वृद्धांना दिले पंचपक्वानांचे भोजन
पंढरपूर-
स्वतःच्या कुटुंब व्यवस्थेने व समाज व्यवस्थेने नाकारलेल्या पण बीईग वुमन फाउंडेशनच्या वतीने त्यां अत्यंत गरजू व निराधार असणाऱ्या अनाथांना आधार देण्यासाठी सुरू केलेल्य अनाथ आश्रम पंढरपूर मधील वृद्ध नागरिकांचा मेरा युवा भारत सोलापूर व संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी यांच्या संयुक्त विद्यमाने मानव मंदिर पंढरपूर यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय वृद्धदिनानिमित्त दि.1 ऑक्टोंबर रोजी आदरपूर्वकपणे सन्मान करून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी संचलित मानव मंदिर पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ (आबा) पांढरे म्हणाले की, देवाला जर या पृथ्वीवर यावे असे वाटले तरी कोणत्यातरी माणसाने त्याला स्वीकारल्याशिवाय स्वतःचे देवत्व सुद्धा त्याला सिद्ध करता येत नसून मूर्ती रुपातल्या देवळातल्या देवाला स्वतःच्या नाकावर बसलेली माशी स्वतः उठवून लावण्या इतकी ही शक्ती नसलेल्या मूर्ती रूपातील न खात्यापित्या व न चालत्या बोलत्या देवाची सेवा करण्यापेक्षा प्रत्येकाने किमान आपापल्या कुटुंबातल्या आई बापाची व आजी आजोबांची तसेच सर्वच वयोगटातील सर्व मानवांची मनापासून सन्मानपूर्वकपणे सेवा करणे (हीच खरी ईश्वर सेवा असून) सध्याच्या व पुढील काळातील प्रमुख गरज व आवश्यकता आहे. आपण आपल्या कुटुंबातील वृद्ध लोकांशी कसे वागतो याचे आपल्या घरातील लहान मुलं निरीक्षण व अनुकरण करीत आहेत याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला आपल्या संतांनी सांगितल्याप्रमाणे तीर्थस्थळी फक्त भोजन, प्रसाद, पाणी, धोंडा, पाने, फुले आणि हार आहे. (पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी) या एका वाक्यातच पूर्ण मानवी जीवनाचा सार आपल्या संतांनी आपल्याला सांगितला असून आपल्या संतांचे किमान एवढे एक वाक्य जरी आपण सर्वांनी खऱ्यानेच आत्मपरीक्षण करून मनापासून आचरणात आणले तरी आपल्या मानवी जन्माचे सार्थक होऊन खऱ्यानेच जिवंत असणाऱ्या माणसातच आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरात जर लहान मुलं व वृद्ध माणसं असतील तरच आपल्या घराला घरपण येते त्यामुळे बुद्ध लोकांचे योग्य प्रकारे पालन पोषण व सन्मान करणे हे प्रत्येक युवकांचे मूलभूत कर्तव्यच आहे. असे मत व्यक्त केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेरा युवा भारत सोलापूरचे जिल्हा युवक अधिकारी राहुल डोंगरे त्यांचे सहकारी भानुदास यादव, सुभाष चव्हाण, संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी संचलित मानव मंदिर पंढरपूरचे सर्व पदाधिकारी, बीईग वुमन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलमान अत्तार त्यांचे सहकारी सलमान शेख व त्यांच्या सर्व कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments