Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा उपक्रम संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा उपक्रम संपन्न




वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय  वडाळा   येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक २५ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियान २०२५ व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एक दिन, एक घंटा, एक साथ राष्ट्रस्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी उपस्थित द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना  स्वच्छता ही सेवा संकल्पना समजून सांगितली. यानंतर  राष्ट्रीय सेवा योजना एककातील स्वयंसेवकांना स्वच्छता ही सेवा दिनाची शपथ स्वयंसेवक निखिल मम्हाणे याद्वारे देण्यात आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एक दिन, एक घंटा, एक साथ या घोषवक्या अंतर्गत  सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात श्रमदान केले. यात प्रामुख्याने प्लास्टिक संकलन आणि कचरा व्यवस्थापन यावरती काम करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचा समारोप रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. उपक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी  मीनाक्षी नाईकनवरे,  अभिजीत नारायणकर,   अजिंक्य ढोरे आणि द्वितीय वर्षातील सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 
Reactions

Post a Comment

0 Comments