चौडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी
तर व्हाईस चेअरमन विलास बडगंची
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील सहकार क्षेत्रातील सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवलेल्या जोडभावी पेठ येथील श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2025 - 26 वर्षाकरिता चेअरमन म्हणून लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांची तर व्हाईस चेअरमन साठी विलास विश्वनाथ बडगंची यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा प्राधिकृत अधिकारी एस एस मलवे (सहकारी अधिकारी श्रेणी - 2) यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी संचालक मंडळाच्या सभेत वरील निवड एकमताने करून नूतन चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी व व्हाईस चेअरमन विलास विश्वनाथ बडगंची यांचा सत्कार अधिकारी एस एस मलवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम, संचालक अरुण चिंता, विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, नरेंद्र बत्तुल, मल्लिकार्जुन खंडे, विष्णू म्याकल, शंकर कोंतम, अजय रंगम, चंद्रकांत रंगम, उमा पुडूर, अंबिका उदगिरी, विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड, भगवंत फलमारे, ॲड. अंबादास कंदीकोंडा आदी उपस्थित होते.
श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्था हे सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेत एकूण ठेवी 255 कोटी असून कर्ज 215 कोटी दिलेले आहेत संस्थेचा एकूण व्यवसाय 470 कोटी पर्यंत पोहोचलेला असून यंदाच्या वर्षीचा निव्वळ नफा पाच कोटी 25 लाख इतका झालेला आहे.*
संस्थेची स्थापना 1988 ला झालेली असून तिला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत. एकूण आठ शाखांमधून काम पाहत असून संस्थेची गुंतवणूक क्षमता फार मोठी झालेली असून ती जवळजवळ 70 कोटी 31 लाख पर्यंत गेलेली आहे संस्थेचा एनपीए प्रमाण अगदी 0% टक्के असून ऑडिट वर्ग स्थापनेपासून सतत "अ" राहिलेला आहे.
संस्थेला आज तागायत एकूण 20 पुरस्कार मिळालेले आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा सहकारनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
0 Comments