Hot Posts

6/recent/ticker-posts

कोल्हापूर– कलबुर्गी रेल्वेचे शहिद अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.

 कोल्हापूर– कलबुर्गी रेल्वेचे शहिद अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषात स्वागत.

 


सांगोला (कटुसत्य वृत्त):-
रेल्वे क्रमांक 01451 कोल्हापूर– कलबुर्गी स्पेशल रेल्वेचे स्वागत सांगोला स्थानकावर शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशिल मोहिते–पाटील, शहीद अशोक कामटे संघटना यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर (गाडी क्र. 01451 व 01452) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रवाशांची मागणी आज पूर्णत्वास आली,या सेवेचा शुभारंभ (फ्लॅग ऑफ) सांगोला रेल्वे स्थानक येथे मा. खासदार यांच्या पत्नी सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगोल्याचे  आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी सौ. डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी फ्लॅग ऑफ समारंभ, रेल्वे इंजिन पूजन व चालकांचा सत्कार शाल , श्रीफळ देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, स्टेशन अधीक्षक,सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी ,शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सर्व पक्षीय नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रेल्वे सेवेमुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व सोलापूर ,कलबुर्गी या दोन्ही दिशांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे  बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सर्वांचे स्वागत व आभार स्टेशन अधीक्षक गंगा कुमार सिंह यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments