Hot Posts

6/recent/ticker-posts

थेऊर येथे घरफोडीत दहा लाखाचे सोने चांदी सह रोख रक्कमे वर दरोडा

 थेऊर येथे घरफोडीत दहा लाखाचे सोने चांदी सह रोख रक्कमे वर दरोडा





थेऊर (कटूसत्य वृत्त):-  तारमळा रस्त्याच्या कडेला असलेल्या बारीक वाडी येथील दशरथ पांडुरंग कुंजीर यांच्या घरी रात्री चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे 10 लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.ही घटना सकाळी उघडकीस आली.

          मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ पांडुरंग कुंजीर (वय 71 रा. तारमळा  बारीक वाडी) हे शेतकरी असून कुटुंबासोबत बारीकवाडी परिसरात राहतात. कुंजीर व त्यांची मुले मंगळवारी (ता.23) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपी गेली असता बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उठले. त्यांनी घराचा दरवाजा आतून उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी मुलांना फोन करून बाहेरील कडी उघडण्यास सांगितले.त्यानंतर मुलांनाही त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळून आले. कुंजीर यांच्या मुलांनी शेजारील मित्रांना सांगून घराच्या कड्या उघडण्यास सांगितल्या. कड्या उघडल्यानंतर सर्वजण बाहेर आले. कुंजीर यांना एका खोलीचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी खोलीत जाऊन पाहणी केली असता, खोलीतील समान अस्तव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसले घरातील लोखंडी कपाट गायब होते कपाटाचा शोध घेतला असता.
         
            घराजवळील नर्सरीच्या जवळ कपाट दिसले कपाटातील सर्व वस्तू चोरीला गेल्याचे दिसून आले कपाटात 1 लाख 75 हजार रुपयांची रोकड, 5 तोळ्यांची मोहनमाळ, 2 तोळ्यांचा लक्ष्मी हार, दीड तोळ्यांची दोन अंगठ्या, 2 तोळ्याचे कर्णफुले व झुंबके , चांदीचे पैजण, कपडे, साड्या व कागदपत्रे असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला असून घटनेची माहिती मिळताच , सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले , लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील , पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार , मल्हारी ढमढेरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली डॉग स्कॉडचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते
Reactions

Post a Comment

0 Comments