पूरग्रस्तांना मदतीचा हात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा सोलापूर व श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड सेंटर सोलापूर तर्फे सीना नदीच्या काठावरील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
सीना दारफळ गावातील पूरग्रस्त भागात जाऊन आमच्या टीमने प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देत किट वितरित केली. सीना नदीच्या दोन्ही बाजूंना मदत पोहोचवली असून, काही लाभार्थ्यांनी या किटबद्दल समाधान व आभार व्यक्त केले.
मात्र, पूर परिस्थिती अजूनही गंभीर असून सीना दारफळ, केवड व उंदरगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे.
0 Comments