सिंहगड प्रशालेच्या खेळाडूंचे शालेय योगा जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश व विभागीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- येथे योगा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये 14 वर्षे वयोगटातील मुली - श्रेया बिरादार ( तृतीय ), तसेच १७ वर्षे वयोगटात मुले- वरदराज बागल( प्रथम), पुष्कर कोले (प्रथम), अशिद शेख( द्वितीय), पद्मनाभ बिराजदार( तृतीय ), मुली- गायत्री सावंजी( प्रथम), तसेच 19 वर्षे वयोगटात मुले- केशव ठिगळे (प्रथम) आरव कोंडूभैरी( प्रथम) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवून यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. वरील सर्व यशस्वी खेळाडूंची संस्थेचे अध्यक्ष एम.एन. नवले सर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .कैलाश करांडे सर तसेच सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूरच्या प्राचार्या.सौ. स्मिता नवले मॅडम, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments