Hot Posts

6/recent/ticker-posts

परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत वन्य जीवन सप्ताह उत्साहात साजरा...!

 परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत वन्य जीवन सप्ताह उत्साहात साजरा...! 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील श्री परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कामती खुर्द लमाण तांडा येथे वन्यजीवन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वनाधिकारी मोहन लटके आणि वन अधिकारी, सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक जब्बार शेख यावेळी बोलताना म्हणाले, " सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे गरजेचे आहे.
वृक्षारोपण काळाची गरज असून वृक्ष टिकले तरच इथून पुढच्या काळामध्ये वन्यप्राणी सुद्धा जगतील अन्यथा भविष्य काळामध्ये मुलांना वाघ ,सिंह किंवा इतर जंगली प्राणी फक्त चित्रापुरतेच बघावे लागतील. आता सर्कस मध्ये तरी हे प्राणी बघायला मिळतात परंतु नंतरच्या काळात  सर्कस मध्ये सुद्धा हे वन्यप्राणी बघायला मिळणार नाहीत. फक्त चित्रापुरते मर्यादित राहतील. वास्तविक पाहता सध्या प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे व्यवस्थित संगोपन करणे गरजेचे आहे. झाडे जगली तरच वन्य प्राणी आणि पशुपक्षी जगतील. अन्यथा कालबाह्य होतील. गेल्या वीस वर्षांपूर्वी जी परिस्थिती वन्य जीवांच्या बाबतीमध्ये होती ती आता राहिलेली नाही. चिमण्या कावळे आणि इतर पक्षी तसेच वन्य प्राण्यांची संख्या उत्तर उत्तर कमी होत चालली असून सिमेंट काँक्रीटची जगले उभा राहू लागल्यामुळे वन्य प्राण्यांची जंगले नष्ट होऊ लागली असून अतिक्रमण वाढल्यामुळेच प्राण्यांना राहण्याची अडचण निर्माण झाल्यामुळे अनेक बिबटे गावामध्ये किंवा गावाच्या परिसरामध्ये येऊन राहू लागल्याचे आपण पाहत आहोत. एकंदरीत सर्वांनीच वन आणि वन्य प्राणी टिकावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे असं मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी शेवटी सांगितले. यावेळी वनाधिकारी मोहन लटके यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. आणि श्री परमेश्वर प्राथमिक आणि आश्रम शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केलं.  या कार्यक्रमासाठी सरपंच, लमाण तांडा तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी राठोड, जयप्रकाश मदने,  आनंद  वळलकाती, रजोधिन शेख, सुरेश गवळी,  बालाजी पुरी आधीसह विविध मान्यवर आणि विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी केले तर आभार आनंद वळलकाती  यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments