अनगरच्या स्टोनब्रिज पब्लिक स्कूलमध्ये चिमुरड्यांनी भरविला बाजार
अनगर (कटूसत्य वृत्त):- सकाळी नऊची वेळ रोज सकाळी प्रार्थना व राष्ट्रगीताचा आवाज ऐकायला यायचा आज मात्र भाजी घ्या ताजी. . .कोथिंबीरी पाच रुपयाला पेंडी. . . कांदा मुळा स्वस्त दिला. . .ये घ्या खमंग भेळ . . .देशी शेवगा घ्या . .पेरू घ्या पेरू . .डाळिंब व बोरं आली लई मस्त या अशा ललकारीने अनगरच्या स्टोनब्रिज पब्लिक स्कूलचा परिसर दाणाणून गेला निमित्त होते शनिवारी असणारा स्टोनब्रिज पब्लिक स्कूलचा बाजार दिवस विद्यार्थ्यांना बाजाराचा अनुभव यावा पैशाची देवाण घेवाण करता यावी यासाठी सदर बाजाराचे आयोजन केले होते.
यावेळी या बाजाराचे उद्घाटन कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर चे प्राचार्य श्री चंद्रकांत ढोले सर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी महादेव चोपडे ज्ञानेश्वर माने दादा नागटिवक श्रीकांत दांडगे विशाल कारंडे सचिन सरक सत्यवान दाढे सोमनाथ ढोले , विशाल निरगिडे,संतोष टकले ग्रामस्थ व पालकवर्ग मोठया संखेने उपस्थित होता. बाजार हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्टोनब्रिजचे प्राचार्य तुळशीदास ढेरे , सांस्कृतिक विभाग प्रमुख रेश्मा पवार, शाहीन शेख, सोनाली सोलंकर, वैशाली गुंड, स्वाती जाधव, विद्या गुंड, गणेश उघडे, बालअन्सर शेख, जनाबाई गायकवाड यांनी परिश्रम घेतले गावकरी, पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमाचे माजी आमदार राजन पाटील,लोकनेतेचे चेअरमन तथा जि. प सदस्य बाळराजे पाटील व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी सर्वाचे कौतुक केले.
0 Comments