ॲड. उमेश मराठे यांचा तीस हजारी लॉयर्स फोरमतर्फे सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

ॲड. उमेश मराठे यांचा तीस हजारी लॉयर्स फोरमतर्फे सत्कार

 ॲड. उमेश मराठे यांचा तीस हजारी लॉयर्स फोरमतर्फे सत्कार



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर शहराच्या विकासाला अडथळा ठरत असलेल्या बीटूच्या जाचक अटींपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी कायदेशीर पातळीवर महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उमेश मराठे यांचा तीस हजारी लॉयर्स फोरमतर्फे सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने आणि ॲड. भारत कट्टे यांच्या हस्ते ॲड. मराठे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ॲड. मराठे यांनी बीटूच्या जाचक अटीविरोधात केलेल्या कायदेशीर लढ्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळण्यास मदत झाली असून नागरिकांच्या हितासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

यावेळी ॲड. आय. बी. पाटील, ॲड. जयदीप माने, ॲड. अतुल कस्तुरे, ॲड. किरण गवळी, ॲड. प्रणित जाधव, ॲड. श्रीहरी कुरापाटी, सोहम खंडागळे, शेजल वैद्य, दत्ता देवकते, प्रवीण वंगारी यांच्यासह अनेक विधिज्ञ व मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages