शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान
पिंपरी, पुणे(कटूसत्य वृत्त):- शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. तसेच तेथे आलेल्या हजारो अनुयायांना संघटनेतर्फे अन्नदान करण्यात आले. या अन्नदान आयोजनात घोडेगाव, पुणे, नाशिक, राजुर, जव्हार , डहाणू, शहापूर, पेण, यावल, नागपूर, अमरावती, धुळे, सोलापूर येथून आलेल्या संघटनेच्या सभासदांनी सहभाग घेतला होता.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे , नयन कांबळे, संतोष गायकवाड, धम्मानंद गायकवाड, प्रकाश निसर्गंध, अमोल अहिरे, ज्योती पुनवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शौर्य, त्याग, पराक्रम, वीरता आणि आत्मसन्मान यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या विजयस्तंभास मानवंदना देण्याचे या संघटनेचे हे चौथे वर्ष आहे. अन्नदान करण्यासाठी पेरणे फाटा येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती.
हा उपक्रम आत्माराम धाबे, प्रा. सुशीलकुमार भारती, योगेश खंडारे, सुखदेव आरसुळे, प्रदीप रोकडे, संदीप ओव्हाळ, अमर कांबळे, सचिन जगधने, वैशाली कांबळे, पूजा दंडे, रवींद्र खरात, मोहन पडघन, मारुती गायकवाड, अजित बनसोडे तसेच सर्व पदाधिकारी व सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.


0 Comments