पुरग्रस्तांना रोहित पवार यांचा मदतीचा हात
टेंभुर्णी/(कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी-सोलापूर जिल्ह्यातील माढा,करमाळा,मोहोळ या तालुक्यामध्ये सिना नदीला आलेल्या पुरानंतर आ.रोहित पवार यांनी पुरग्रस्त भागात दौरा केल्यानंतर त्यांची अशी भावना होती आपणही पूरग्रस्तांसाठी मदत केली पाहिजे. या भावनेतून दिवाळीचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तूंमध्ये किराणा किट,मच्छरांसाठी अगरबत्त्या,मेडिक्लो- पाणी स्वच्छ करण्याचे औषध असे किट त्यांनी पाठवून दिले. या किट वाटपावेळी आ.अभिजीत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख,मा.जि.प.सदस्य भारत शिंदे, तालुकाध्यक्ष ॲड.बाळासाहेब पाटील,युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख,युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी,पंढरपूरचे तालुकाध्यक्ष अतुल भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार अभिजीत पाटील यांनी आ.रोहित पवार यांचे हे किट पुरग्रस्त लोकांना पाठवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आभार व्यक्त करत सांगितले की आ.रोहित पवार यांच्याकडून हे आलेले किटचे वाटप सोलापूर जिल्ह्यातील माढा,करमाळा,मोहोळ या तालुक्यामध्ये होणार असून वाटपाची जबाबदारी या तिन्ही तालुक्यातील तालुकाध्यक्षाकडे देण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून या किटचे वाटप होणार आहे. आ.रोहित पवार यांनी पूरग्रस्त लोकांची गरज ओळखून केलेल्या मदतीमुळे लोकांमध्ये चांगली भावना असल्याचे मत तालुकाध्यक्ष ॲड.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के,निलेश पाटील,अभिजीत साठे,राजाभाऊ भांगिरे,वैभव महाडिक,विद्यार्थी तालुकाध्यक्ष सत्यवान लटके उपस्थित होते...!
आ.रोहित पवार हे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व असून त्यांनी दिवाळीचे औचित्य साधून आपल्या जिल्ह्यातील माढा,करमाळा,मोहोळ या तिन्ही तालुक्यातील पुरग्रस्त भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवून दिल्याबद्दल त्यांचे आभार. कोणत्याही नैसर्गिक संकटात आ.रोहित पवार यांनी कायम मदतीचा हात दिला आहे-सुरज देशमुख,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवा दी युवक काँग्रेस

0 Comments