पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूककरीता मतदान केंद्रावर जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम) दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजलेपासून शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे तयार करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी मतदार यंत्र सिलिंग करण्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदान प्रक्रिया दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक होण्यात करीता सर्व मतदान केंद्राचे प्रभागनिहाय सिंलिंग करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. सदर ठिकाणी प्रवेशासाठी पंढरपूर नगरपरिषद कार्यालयाच्या ओळखपत्र कक्षातून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या
0 Comments